Thursday, 17 August 2017




माझा होतो आहे ठोस वारसा
नाही आता मीही तुझा सारखा

सोडुन गेली आहे तू विराणी
ऐकत राहतो तिला तसे सारखा

कोणते गणित आरंभले जीवना
भाग जातो काय शून्यास बारका

झाले हे इतके जगणे काय जुने
जिर्णोद्धारा न या मिळती तारखा

मनास कोणतेही ऋतु चक्र नाही
कुठे बदलती मग हे दिवस तारखा

प्रीतीची भूमिती मी काय सांगू
वर्तुळाचा परीघ आहे सारखा

चमचमते नभ नेमके स्वप्नातले
असे तारकांचा अंधार यार का ?

का एव्हढे तूही स्पर्शून गेली
गंध येतो अरे मला एकसारखा

नचिकेत

Monday, 14 August 2017

स्वातंत्र्य



साम्राज्याच्या हृदयात शाई
झाली आहे घनघोर लढाई
रुजले होते कैफ मुक्ततेचे
येथे पेटली होती धडाई

लेखणी बोलली जागे व्हावे
देशासाठी सगळ्यांस निघावे
ही घ्या आता पेटवून मशाल
आहे अंधाराशीच लढाई

येइल कधीतरी आप कन्हाई
देहास मनाचा बाण चढावा
अखंड आहुतीस दान मिळावे
देशोधडीचे हे कार्य झळकावे

डोळ्यातील काय मागती दीप
जाईल दूरवर हाच किती देश
या दीपांनो उजळूनी टाका
स्वातंत्र्याचीच अखंड लढाई

नचिकेत

Saturday, 12 August 2017


पिंजरा

आजन्म आहे एका कैद्याचा
मनाने केला सांभाळ होता
दोन गजातून सवय ही झाली
आभाळ आहे ते बघण्याची

आभाळ म्हणाले उडता राहा
निवारा मिळाला तसाच राहा
पिंजरा भावुक....बंदिस्त झाला
नशाही लाभली ती जगण्याची

कल्पना झाल्या बंदिस्त होत्या
चौकट आपली बिनधास्त होती
वाढली नाही उगाचच काही
सजाही इवल्या त्या माणसांची

पोपट आला फांदीवर बसला
खाल्ले फळ तसाच उडून गेला
पिंजरा नाही भिंतीच नाही
अवस्था काय अरे माणसांची

नचिकेत
तू कोणाला स्वप्नं विकली काय त्याचा भाव होता
राहिली काय आशा जिवंत काळ तेव्हढी जीवना

दिले होते का सूत्र हाती बांधुन घर आभाळात
जगाने गाठली होती उंची का एव्हढी जीवना

अश्रु नव्हते डोळ्यात कुठे जीव आनंदे तळपती
पराकोटीचं टोक गाठे कल्पना एव्हढी जीवना

लागला आहे बाजार विकले जाते सर्वकाही
हजारात मिळे माणुस मंदी का एव्हढी जीवना

एकदाच आता शेवटचे चल भेटु या दरीत सखे
जायचे राहिले होते खोल ती केव्हढी जीवना

नचिकेत

Wednesday, 9 August 2017

वारा येतो आधी मग वादळ येते
माझ्या मार्गावरती तुझं बा घर येते

जाता जाता अगतीक हवा वर येते
चौका चौका वरती तुज का सर येते

या त्या भूमीवर नाहक वावर का बा
आभाळाला तुच पाठ नवा वर देते

जग जग आहे जर वाहन त्यावर कोणा
नाकारूनी मज गाव बरा डर देते

काळे आहे ढग त्यावर चादर घाला
लावा टाळा सर तीच नवे सल देते

कोडे पडले जग तेच दवावर येते
पावसा वाटते बहार का छळ देते

नचिकेत
भासा मधून भासाला भासाकडे नेतो
वारा करून गारा आभाळा बरे नेतो

गावाकडून येतो तो गावाकडे जातो
वार्ता धरून वारा कोणाचा बरे येतो

आला नकार आहे तो ध्येयाकडे नेतो
दरीच्या बाजूला जसा डोंगर बरे येतो

जागा दिलीच नाही मागे लागले सारे
चंद्रा करून साचा गावासी बरे देतो

नचिकेत