Wednesday 13 September 2017

ठरवून प्रेम करणे म्हणजे फार होते
तहानेला इतके जळ फार फार होते

बुडत्याला आधार हवा काठीचातरी
जगाची नेमक्यावेळी तलवार होते

अरे सावलीला काहीएका मन नाही
सश्यासाठी ती उंच घार तयार होते

नाक घासलेच शेवटी तुझ्या पायावर
कोणत्या वरदानास तुही तय्यार होते

नाजुक ती परिस्थिती हळवे गाव होते
हाल मनाचे कळी कळीला यार होते

नचिकेत
नात्याआड चाललेला काय व्यवहार आहे
मुलाने आईस विचारले तु मला काय दिले

जळात खोल जाता कितीक संदर्भ बदलतात
माणसात विभाग गेला पैश्याने काय दिले

किती सहज सोपेच होते व्यवहार आप्तांचे
पगार मागितला त्यांनी प्रेमाने काय दिले

ढग दाटले जरुर होते पाउस पडला नाही
हवामान खात्याच्या त्या सुचनांनी काय दिले

ती आली होती जीवनात काय करुन गेली
शेवटी वाळवंटास हिरवाईने काय दिले

तिने दिला होता ओठी एक प्याला जीवनाचा
याच अमली पदार्थाने किती काय काय दिले

नचिकेत
सख्य तुझे सगळ्यांशीच सर्वविदीत आहे
नेमके तुझ्या ऋतूंनी मला वगळले कसे

उन्हात वाढलो मी तसाच मोठा झालो
अनायास सावलीचे अहम झळकले कसे

नाजूक वाट नाही जर हे आयुष्य आहे
मजबुत सांधलेले नातेच तडकले कसे

सगळेच सारखे होते कमी अधिक प्रमाण
व्यवस्था लोण राबली झेंडे फडकले कसे

जाणार प्राण होता एव्हढ्यात ती आली
कळले मला आता जीवन धडकले कसे

सराईत साक्षीस भेटले नेहमी तिथे
कोर्टाने दाखवले जीवन सरकले कसे

नचिकेत

Thursday 17 August 2017




माझा होतो आहे ठोस वारसा
नाही आता मीही तुझा सारखा

सोडुन गेली आहे तू विराणी
ऐकत राहतो तिला तसे सारखा

कोणते गणित आरंभले जीवना
भाग जातो काय शून्यास बारका

झाले हे इतके जगणे काय जुने
जिर्णोद्धारा न या मिळती तारखा

मनास कोणतेही ऋतु चक्र नाही
कुठे बदलती मग हे दिवस तारखा

प्रीतीची भूमिती मी काय सांगू
वर्तुळाचा परीघ आहे सारखा

चमचमते नभ नेमके स्वप्नातले
असे तारकांचा अंधार यार का ?

का एव्हढे तूही स्पर्शून गेली
गंध येतो अरे मला एकसारखा

नचिकेत

Monday 14 August 2017

स्वातंत्र्य



साम्राज्याच्या हृदयात शाई
झाली आहे घनघोर लढाई
रुजले होते कैफ मुक्ततेचे
येथे पेटली होती धडाई

लेखणी बोलली जागे व्हावे
देशासाठी सगळ्यांस निघावे
ही घ्या आता पेटवून मशाल
आहे अंधाराशीच लढाई

येइल कधीतरी आप कन्हाई
देहास मनाचा बाण चढावा
अखंड आहुतीस दान मिळावे
देशोधडीचे हे कार्य झळकावे

डोळ्यातील काय मागती दीप
जाईल दूरवर हाच किती देश
या दीपांनो उजळूनी टाका
स्वातंत्र्याचीच अखंड लढाई

नचिकेत

Saturday 12 August 2017


पिंजरा

आजन्म आहे एका कैद्याचा
मनाने केला सांभाळ होता
दोन गजातून सवय ही झाली
आभाळ आहे ते बघण्याची

आभाळ म्हणाले उडता राहा
निवारा मिळाला तसाच राहा
पिंजरा भावुक....बंदिस्त झाला
नशाही लाभली ती जगण्याची

कल्पना झाल्या बंदिस्त होत्या
चौकट आपली बिनधास्त होती
वाढली नाही उगाचच काही
सजाही इवल्या त्या माणसांची

पोपट आला फांदीवर बसला
खाल्ले फळ तसाच उडून गेला
पिंजरा नाही भिंतीच नाही
अवस्था काय अरे माणसांची

नचिकेत
तू कोणाला स्वप्नं विकली काय त्याचा भाव होता
राहिली काय आशा जिवंत काळ तेव्हढी जीवना

दिले होते का सूत्र हाती बांधुन घर आभाळात
जगाने गाठली होती उंची का एव्हढी जीवना

अश्रु नव्हते डोळ्यात कुठे जीव आनंदे तळपती
पराकोटीचं टोक गाठे कल्पना एव्हढी जीवना

लागला आहे बाजार विकले जाते सर्वकाही
हजारात मिळे माणुस मंदी का एव्हढी जीवना

एकदाच आता शेवटचे चल भेटु या दरीत सखे
जायचे राहिले होते खोल ती केव्हढी जीवना

नचिकेत